आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर, अधिसभेचे 53 उमेदवार रिंगणात:37 उमेदवारांचे अर्ज मागे, 10 जागांसाठी 26 नोव्हेंबरला मतदान

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील अधिसभा निवडणुकीत 10 जागांसाठी 53 उमेदवार रिंगणात आहेत. दाखल झालेल्या 90 उमेदवारांपैकी 37 उमेदवारांनी शुक्रवारी (11 नोव्हेंबर) अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे, उर्वरित अधिसभा, विद्यापरिषदेचा निवडणूक कार्यक्रमही सुरू झाला आहे.

पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या 10 जागांची निवडणूक 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील पाच जागा आहेत. आरक्षितच्याही पाच वेगवेगळ्या जागा आहेत. प्रत्येकी एक उमेदवार निवडून येणार आहे. खुल्या गटातून 44 उमेदवारांचे अर्ज वैध झाले आहेत.

अनुसूचति जाती- 5, अनुसचित जमाती- 7, भटके विमुक्त जाती- 16, इतर मागास प्रवर्ग- 9, महिला आरक्षणातून 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 37 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता 10 जागांसाठी 53 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिलेले आहेत. 4 जिल्ह्यातील 51 मतदान केंद्रावर 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 दरम्यान मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव विष्णु कहाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब आदी परिश्रम घेत आहेत.

प्रवर्गनिहाय रिंगणातील उमेदवार असे

अनुसूचित जाती : बनसोडे निवृत्ती विश्वनाथ, दुर्गे जगन रुपचंद, जोगदंड रोहित दिपक, कांबळे शिरीष मिलिंदराव, मगरे सुनील यादवराव, तायडे राहुल भीमराव

अनुसूचित जमाती : बर्डे भागवत रामप्रसाद, माळी शहाजी विश्वनाथ, मोहम्मद अजारुद्दीन मोहम्मद सलीम, निकम सुनील पुंडलिकराव

वि.जा, भ.ज : आघाव विनोद संतोष, भांगे दत्तात्रय सुंदरराव, कांबळे रखमाजी भागुजी, फड चंद्रकांत शिवाजीराव, सलामपुरे पुनम केशव

इतर मागास वर्ग : जाधव संदीप दत्तात्रय, राऊत सुभाष किसनराव, थोरात संतोष कारभारी, वाघ गणेश लक्ष्मण

महिला उमेदवार : गायकवाड नंदा लक्ष्मणराव, काळे हर्षमाला नरेंद्र, पाटील पुनम कौलास, तुपे ज्योती आसाराम

खुला : बनसोडे पंकज बळीराम, भोसले संभाजी शिवाजीराव, भुतेकर रमेश खुशालराव, चव्हाण चंद्रकांत सोपानराव, धूपे सतीश असाराम, फंदे नितीन सत्यप्रेम, गवते सुनील अकुंशराव, गवई विकास दत्तू, गुट्टे हनुमंत रघुनाथ, होके पाटील योगिता अशोकराव़, इंगळे सुचिता चोखाजी, जाधव सुनील नामदेव, कदम अमर अंबादासराव, काळे नरेंद्र हिरालाल, काळे सुनील एकनाथराव, खैरनार भारत रामदास, नावंदर आशिष गोविंदप्रसाद, नवले लक्ष्मण उत्तमराव, निकम भागवत कुर्मादास, पवार विजय दादासाहेब, सलामपुरे पूनम केशव, सराफ तुकाराम शरदराव, सरकटे विलास कैलास, शेख जहूर खालेद, शिंगटे अमोल सर्जेराव, सोमवंशी हरिदास भगवानराव, तडवी अनिस शरीफ, तुपे पंडीत महीपती, वाघमारे परमेश्वर कचरू.

बातम्या आणखी आहेत...