आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी ठरवलेल्या अकॅडमिक कॅलेंडरनुसार विद्यार्थ्यांचे पेपर झालेले नाहीत. तासिकाही पूर्ण न झाल्याने अभ्यासक्रम अपूर्ण आहे. त्यामुळे तत्काळ पदवी परीक्षा पुढे ढकलून एक (जुलै)नंतर घ्याव्यात, या मागणीसाठी सोमवारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात आले. पदवी परीक्षेला १ जूनपासून सुरुवात झाली. परंतु, २०२१-२०२२ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइनमुळे पूर्णत: विस्कळीत होते. त्यानंतर अचानक ऑफलाइन वर्ग सुरू झाले. यात २० मे रोजी अभ्यासक्रम संपला, असे जाहीर करून महाविद्यालय बंद केले. त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाली. यात ४५ दिवसांचा कालावधी होता. त्यातील १० दिवस सुट्यात गेले. उर्वरित ३५ दिवसांत विद्यार्थ्यांना त्यांच्या युनिट टेस्ट द्यायच्या होत्या. सबमिशन, प्रोजेक्ट तयार करायचे होते. ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे. त्यांना ६० टक्के गुण अनिवार्य आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे काय होणार, त्यामुळे आधी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यानंतर महिन्याचा अवधी देऊन परीक्षा घ्या, असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याआधी अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. वेळापत्रकानुसार परीक्षा हाेईल, असे कुलगुरू डॉ. येवले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.