आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:पदवीचे निकाल 25 जूननंतर; पदव्युत्तरचे प्रवेश 5 जुलैपासून ; लवकरच अर्ज छाननी प्रक्रिया सुरु होईल

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदवी परीक्षांचा निकाल २५ जून ते ५ जुलैदरम्यान जाहीर होतील. तर पदव्युत्तर प्रवेशासाठी २४ जूनपासून ऑनलाइन नोंदणी करता येईल. पहिल्या टप्प्यात वैयक्तिक माहिती, निकालानंतर ५ ते १५ जुलै शैक्षणिक माहिती भरता येईल, अशी माहिती विद्यापीठातील प्रवेश समिती अध्यक्ष डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली. ६ ते १८ जुलैदरम्यान अर्ज छाननी प्रक्रिया होईल. इतर राज्य व इतर विद्यापीठाच्या प्रत्येकी दहा टक्के जागांसाठी प्रवेश २८ जुलै रोजी होतील. त्यानंतर त्या फेरीतील रिक्त जागांसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच्या ८० टक्के जागांसाठी ३० ते ३१ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया होऊन १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू होईल. रिक्त जागा ३ ऑगस्ट रोजी जाहीर होतील, तर ७ जुलैला स्पॉट अॅडमिशनची प्रक्रिया होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...