आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकन्नड तालुक्यातील सुरु असलेल्या 49 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीपैकी चर्चा आहे, ती वडनेरच्या निवडणुकीची कारण ही ग्रामपंचायत तालुक्यातील सध्या सर्वात मोठी आहे. या निवडणुकीत 11 सदस्यपदासाठी तब्बल 33 उमेदवार तर सरपंचपदासाठी 5 उमेदवार रिंगणाति आहेत.
थेट जनतेतीन निवडून यायचे असल्याने सेवानिवृत्त गटविकास अधिकारी, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्यासह सरपंचपदासाठी नवखे तरुणासह तब्बल 5 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरत आपले नशीब अजामत आहे.
मतदानाच्या 48 तास आधी निवडणुकीचा जाहीर प्रचार थाबला असल्याने आता गुप्त गाठीभेटी वर सध्या उमेदवारांचा जोर सुरू आहे.गावात पहिल्यांदा तीन पॅनल तयार झाले आहे. तर दोन उमेदवारांनी पँनल न करता एकला चलो रे ची भुमिका घेत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. प्रत्येक उमेदवारांनी, तिन्ही पँनलने आपआपल्या परिने जोरदार प्रचाराची रणनीती आखत जोरात प्रचार केला. विधानसभा, जिल्हा परिषदेच्या सारख्या मोठ्या निवडणुकीचा अनुभव वडनेर घेत आहे. सोसायटीची निवडणूक वगळता या आधी पंधरा ते वीस वर्षांपासून इतका निवडणुकीचा गाजावाजा कधी वडनेरकरांनी अनुभवला नसल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले.
गावातील समस्या
आजही गावातील नागरिकांना अनेक नागरी समस्याचा सामना करावा लागतो. गावात स्मशानभूमी आहे पण स्मशानभूमीचे वरचे पत्रे कधीचेच उडाले आहे. अंतयात्रा घेऊन जाण्यासाठी मोठ मोठ्या खड्याचा सामना करत कधीबशी वाट स्मशानभूमी गाठावी लागते. गावातील व मुख्य बाजारपेठेतील पथदिवे बाराही महिणे बंद असतात. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण पदधिका-याचे कोणतेही लक्ष नसल्याने आरोग्य सेवेचे अक्षरशा तीन तेरा वाजले आहे. वडनेर गाव तांडा या रस्त्याचे कित्येक वर्षांपासून भिजते घोगंडे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.