आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार असून उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या, मतदारांसोबत गाठीभेटी व कॉर्नर बैठका घेण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी नात्यागोत्यातील लढतीने निवडणुकीत चांगलीच रंगत आणली आहे. जालना, नांदेड, हिंगोलीमध्ये बऱ्याच गावांमध्ये सासू-सूना, भाऊ-भाऊ, जावा-जावा, एकमेकांसमोर उभे आहेत.
नात्यागोत्यातील लढती यंदा औरंगाबाद जिल्ह्यात जास्त असल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने वैजापूर तालुक्यातील लासूरगाव सर्कलमध्ये तीन ग्रामपंचायतींत सासू व सूना आमने-सामने आहेत. वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव, धोंदलगाव आणि शिवराई या ठिकाणी सासू-सुना आमने सामने आहेत. बोरदहेगाव येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधील लढत अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये सासू-सुनांनी एकमेकींपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील एक जागा ही अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून या जागेसाठी मीनाक्षी त्रिभुवन व पूजा त्रिभुवन या दोघी आमनेसामने आहेत, तर मीनाक्षी त्रिभुवन या त्रिभुवनच्या चुलत सासू आहेत. तालुक्यातील धोंदलगाव येथे पण ग्रामपंचायत निवडणुकीतील सासू-सुनेची लढत लक्षवेधी असणार आहे.
धोंदलगाव येथील प्रभाग क्रमांक एकमधील जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी असून या जागेसाठी गोकर्णा आवारे व कल्याणी आवारे या सासू-सुना आमने-सामने आहेत. गोकर्णा या कल्याणी यांच्या चुलत सासू असून त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत आहे. शिवराई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून रंजनाताई चव्हाण व शीलाताई चव्हाण या दोघींमध्ये चुरशीची लढत होत आहे. यामध्ये रंजनाताई या शीलाताई यांच्या चुलत सासू आहेत. दरम्यान, बोरदहेगाव ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. औरंगाबादप्रमाणे राजकीय घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रंगतदार लढती होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली : शेतातील आखाड्यावर जाऊन मतदारांची विनवणी
कळमनुरी तालुक्यातील कान्हेगाव येथील जिजाबाई मुखरू गिरी व त्यांची सून सिंधुबाई अनिल गिरी हे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आखाडा बाळापूर येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या पॅनलचे विरुद्ध पॅनलमध्ये त्यांचे लहान भाऊ विजय बोंढारे निवडणूक रिंगणात आहेत. शेतातील आखाड्यावर जात मतदारांची विनवणी केली जात आहे.
नांदेड : नायगाव, मुदखेड तालुक्याकडे सर्वांचे लक्ष
जिल्ह्यात ६ हजार ८६२ जागांसाठी १५ हजार ३६० उमेदवार उभे आहेत. एक हजार ६३८ सदस्य बिनविरोध निवडले आहेत. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील अंचोली येथे सुनील मोरे व ऋषिकेश मोरे हे दोन सख्खे चुलत भाऊ एकाच प्रभागातून, मुदखेड तालुक्यातील बारड येथे प्रभाग चारमध्ये सुरेखा टिपरसे व मीनाक्षी टिपरसे या दोन सख्ख्या जावा आमनेसामने आहेत.
जालना : घरातील उमेदवार उभे करण्यासाठी चढाओढ
भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे दोन पॅनलमध्ये लढत आहे. दोन्ही पॅनलमध्ये एकाच घरातील सासू-सुनेला उमेदवारी दिली आहे. माजी सरपंच हिंगे यांनी आपल्या पॅनलमध्ये एका ठिकाणी पत्नी तर एका दुसऱ्या वाॕॅर्डातून सूनबाईंना उमेदवारी दिली आहे. रामभाऊ दुधे यांनीदेखील दोन वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये आपल्या घरातीलच उमेदवार दिले आहेत. यात पत्नी व भावजयीचा समावेश आहे. पिंपळगाव-रेणुकाई येथे दीर- भावजय यांच्यातच लढत होत आहे. याच गावात रेणुकामाता ग्रामविकास पॅनलकडून सुमनबाई सुरेश जाधव तर रेणुकामाता ग्राम महाविकास पॅनलकडून चंद्रकलाबाई पंडित नरवाडे नणंद-भावजयीमध्ये सामना होत आहे.
या जागेसाठी मीनाक्षी त्रिभुवन व पूजा त्रिभुवन या दोघी आमनेसामने आहेत, तर मीनाक्षी त्रिभुवन या त्रिभुवनच्या चुलत सासू आहेत. तालुक्यातील धोंदलगाव येथे पण ग्रामपंचायत निवडणुकीतील सासू-सुनेची लढत लक्षवेधी असणार आहे. धोंदलगाव येथील प्रभाग क्रमांक एकमधील जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी असून या जागेसाठी गोकर्णा आवारे व कल्याणी आवारे या सासू-सुना आमने-सामने आहेत. गोकर्णा या कल्याणी यांच्या चुलत सासू असून त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत आहे. शिवराई ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून रंजनाताई चव्हाण व शीलाताई चव्हाण या दोघींमध्ये चुरशीची लढत होत आहे. यामध्ये रंजनाताई या शीलाताई यांच्या चुलत सासू आहेत. दरम्यान, बोरदहेगाव ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. औरंगाबादप्रमाणे राजकीय घडामोडींसाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रंगतदार लढती होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.