आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवस शासकीय सुट्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान असल्याने गावी जाण्यासाठी अचानक बसच्या प्रवाशांची संख्या वाढली. त्यामुळे शनिवारी प्रवाशांना बसमध्ये जागा पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. महिला प्रवासी आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले.
शनिवार, रविवारी सलग सुट्या आल्या. १८ डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या शुक्रवारी सायंकाळपासून वाढली होती. शनिवारी पहाटेपासून बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. त्या तुलनेत बसची संख्या कमी होती. त्यामुळे जागा पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. कुणी खिडकीतून रुमाल, बॅग, पिशवी टाकून जागा पकडत होते. सिडको बसस्थानकातून बसमध्ये जागा नसल्यामुळे अनेक प्रवाशांना तीन-चार बसची वाट पाहावी लागली. तरीही जागा मिळत नसल्याने उभे राहून प्रवास करावा लागला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.