आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नव्हती. आता निर्बंध उठल्याने शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष समितीकडून शोभायात्रा काढण्यात आली. हा कार्यक्रम शिवसेनाप्रणीत असल्यामुळे भाजप व इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. चंद्रकांत खैरे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे सेनेतील सर्व नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र, कार्यकर्त्यांची वानवा जाणवली.
शहराचे आराध्य दैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरात खैरे यांच्या हस्ते गणपतीचे पूजन व महाआरती करून शोभायात्रेला सुरुवात झाली. या वेळी उंट, घोडे, बाल वारकरी मंडळ, महिलांचे भजनी मंडळ, लेझीम व ढोल पथक, बँड पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले. शोभायात्रा खडकेश्वर येथील महादेव मंदिराच्या मैदानावर विसर्जित करण्यात आली.
हिंदू नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष गोपाळ कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विभाश्रीदीदी, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, मकरंद कुलकर्णी, व्यापारी महासंघाचे प्रफुल्ल मालाणी, आशुतोष डंक, युवा सेनेचे ऋषिकेश खैरे आदींची उपस्थिती होती. गुढीपाडवा शोभायात्रा आणि झुलेलाल जयंती मिरवणूक एकत्र निघाल्यामुळे जुन्या शहरात वाहतुकीची कोंडी झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.