आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:बोडखी येथे आजोबा अन नातीचा विहीरीत पडून मृत्यू, अक्समात मृत्यूची नोंद

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दोघांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

हिंगोली तालुक्यातील बोडखी येथे आजोबासह नातीचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील बोडखी येथील मुकींदा लोडबा धवसे (६५) यांच्या शेतात तुरीच्या पिकाचे खुंटाडे उचलण्यासाठी धवसे कुटुंबिय गेले होते. सकाळी दहा वाजण्यास सुमारास त्यांची नात सोनालीका सुभाष धवसे (११) हिला तहान लागली. त्यामुळे तिने पाणी देण्याची मागणी केली. मात्र सोबत पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे मुकींदा धवसे व त्यांची पत्नी सोनालिका हिस घेऊन बाजूला असलेल्या शेतातील विहीरीवर गेले.

यावेळी सोनालीका विहीरीत उतरून पाणी पित असतांना तिचा पाय घसरला अन ती पाण्यास पडली. ती पाण्यात बुडुत असल्याचे लक्षात येताच तिला वाचविण्यासाठी मुकींदा यांनी पाण्यात उडी मारली मात्र त्यांना पोहणे नसल्यामुळे ते देखील पाण्यात बुडू लागले. हा प्रकार विहीरीवर थांबलेल्या मुकींदा धवसे यांच्या पत्नीला लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड सुरु केली.

मात्र मदत मिळे पर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरक्षक राहुल तायडे, जमादार नंदकुमार मस्के, पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिस व नागरीकांनी दोघांचेही मृतदेह विहिरीच्या बाहेर काढले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...