आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागंगापूर तालुक्यातील वझर येथे एका तरुणाने मुलीला पळवल्याचा आरोप करीत त्याच्या ७० वर्षीय आजीला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. शिवीगाळ करीत मारहाण करतानाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर तो व्हायरल करण्यात आला. या प्रकरणात तिघांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाेघांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील वझर गावाजवळील पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान, ओझर गावातील विवेक ऊर्फ चवल्या पिंपळे, नीतूबाई चवल्या पिंपळे, भावड्या पिंपळे त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन तुमच्या नातवाने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप केला व त्या वृद्धेस गंगापूर फाट्यावरून वझरला पारधी वस्तीवर नेण्यात आले. तेथे आल्यावर आरोपीने विवस्त्र करून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी या घटनेतील तीनपैकी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्यांमध्ये भावड्या पिंपळे, नीतूबाई विवेक ऊर्फ चवल्या पिंपळे यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात विवेक ऊर्फ चवल्या पिंपळे, नीतूबाई, भावड्या पिंपळे (सर्व रा. वझर) यांच्याविरोधात कलम ३५४, ३६३, ३२३, ५०४, ५०६ भादंवि सहकलम - ६७ (ए) माहिती तंत्रज्ञाननुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित वृद्धा दयेची भीक मागत होती, तरीही मारहाण पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही. उलट मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.