आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:फिर्याद देणारा नातूच निघाला आजोबाचा खूनी, दाताडा बुद्रुक येथील घटना

हिंगोली8 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे आजोबाच्या खुनाची फिर्याद देणारा नातूच खूनी निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षापुर्वी झालेल्या खून प्रकरणाचा वाद मिटवला जात नसल्याने सहा जणांवर आरोप करून फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील नितीन कवडे याने सेनगाव पोलिस ठाण्यात ता. १० ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामध्ये त्यांचे आजोबा नामदेव खंडूजी कवडे (७०) यांचा गावातील अमोल शिंदे यांच्यासह सहा जणांनी जून्या वादातून गुप्ती व चाकूने वार करून खून केल्याचे तक्रारीत नमुद केले होते. त्यावरून पोलिसांनी अमोल शिंदे यांच्यासह सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल होता. पोलिस निरीक्षक सरदार सिंह ठाकूर, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार अनिल भारती यांच्या पथकाने अधिक तपास सुरु केला होता.

यामध्ये पोलिसांनी आरोपींचे मोबाईल लोकेशन काढले असता सर्व जण वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे आढळून आले. तर फिर्यादी नितीन कवडे याने या प्रकरणानंतर आपण बेशुद्ध झाल्याचे सांगितले. मात्र घटना घडल्यानंतर काही वेळातच नितीन कवडे याने त्याच्या मोबाइलवरून ११ कॉल्स केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे नितीन कवडे हाच खूनी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सेनगाव पोलिसांनी त्यास ता. १८ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यानेही खुनाची कबुली दिली आहे. तसेच त्याने खुनात वापरलेली गुप्ती व चाकू शेतातून काढून दिला आहे.

दरम्यान, दोन वर्षापुर्वी झालेल्या कैलास शिंदे यांचे खून प्रकरण मिटविण्यासाठी आजोबा नामदेव कवडे यांचा खून करून त्याचा आरोप अमोल शिंदे व इतरांवर लावण्यात आल्याची कबुलीही त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...