आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा गौरव दिन:शिवछत्रपती महाविद्यालयात ग्रंथदिंडी

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवछत्रपती महाविद्यालयाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी काढली हाेती. प्रा. दिलीप महालिंगे यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. त्यानंतर शिवछत्रपती महाविद्यालयापासून पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही ग्रंथदिंडी नेण्यात आली. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राहुल चव्हाण, मराठी विभागप्रमुख डॉ. वैजनाथ कदम यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर पुन्हा महाविद्यालयाच्या प्रांगणात अाल्यानंतर दिंडीचा समाराेप केला.

या वेळी वासुदेव, वाघ्या-मुरळी, पोतराज, मावळे, क्रांतिकारक, समाजसुधारकांची विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून सहभाग नाेंदवला हाेता. प्राध्यापकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली हाेती. ही ग्रंथ दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या वेळी प्रा. भरत वहाटुळे, प्रा. संजय राऊत, डॉ. गहिनीनाथ वळेकर, प्रा. मनीषा राऊतमारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...