आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला फोरम:शहराच्या विकासात महिलांचे मोठे योगदान ; चर्चासत्रात प्रतिपादन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहरात आरोग्य, शिक्षण, उद्योग, विधी, कला, क्रीडा आणि शासकीय क्षेत्रांत महिलांचा दबदबा आहे. शहराच्या जडणघडणीत महिलांचे महत्त्वाचे योगदान मोठे आहे. येऊ घातलेली ‘डब्ल्यू-२०’ देखील महिलांसाठी विशेष ठरणार आहे, असे मत औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी व्यक्त केले.औरंगाबाद फर्स्ट संघटनेच्या महिलांच्या फोरमद्वारे ‘शहर विकासात महिलांचे योगदान’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ५० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. डॉ. नीता पाडळकर आणि ज्योती दाशरथी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. मधुरा अन्वीकर यांनी सर्व प्रस्तावांचे संकलन केले. मैथिली तांबोळकर यांनी उपक्रमाची पुढील दिशा मांडली.

चर्चासत्रात मांडण्यात आलेले मुद्दे { विधी व न्याय क्षेत्रातील मान्यवरांनी कायद्यांबाबत सामान्य नागरिकांत जाणीव जागृतीवर भर दिला. { महिला बचत गटांच्या उभारणीपासून ते विक्री, विपणनापर्यंत मार्गदर्शन कसे करता येईल याबद्दलही काही उपाय मांडण्यात आले. { कला क्षेत्रातील सुविधा, खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा व सुरक्षा यासंदर्भातील काही मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. { भिक्षेकरी, तृतीयपंथी अशा काही दुर्लक्षित वर्गाच्या पुनर्वसनासाठीही मुद्दे मांडण्यात आले. { आरोग्यसेवेत पोषण, मातामृत्यू, कुटुंब नियोजन, स्त्रीरोग व स्त्रीआरोग्य याबाबतही तज्ज्ञांनी प्रस्ताव मांडले.

समस्या निवारणासाठी सुचवला कृती आराखडा { शहरामध्ये उत्तम मनुष्यबळ येण्यासाठी प्रयत्न गरजेचे { स्वच्छतागृहे, पार्किंग, उद्यानांसह अपंग व वृद्धांसाठी सहज ये-जा करणे शक्य होईल अशा पायाभूत सुविधांची आवश्यकता { महिला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांनाही कामकाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याची गरज { औद्यागिक क्षेत्रात वाहतूक सुरक्षेची उपाययोजना करावी. पाळणाघर व उपाहारगृहांची उभारणी करावी

बातम्या आणखी आहेत...