आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउनमध्ये सूट:बीडकरांना मोठा दिलासा, नागरिकांच्या मागणीनंतर लॉकडाउनमध्ये सूट

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाउन आहे

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि रुग्णांच्या वाढीनंतर बीडमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. पण, यामुळे व्यापाऱ्यांसह अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लॉकडाउनमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीडमध्ये 26 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. पण, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नागरिकांच्या मागण्यांचा विचार करुन लॉकडाउनमध्ये मोठी सूट दिली. यानुसार आता लॉकडाउन काळात सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासह सर्व प्रकारच्या व्यापारास परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना त्यांनी निर्देश दिले आहेत. यानुसार, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी उद्या (दि. 30) मंगळवारपासून लॉकडाऊन मध्ये सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या व्यवसायांना मुभा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. पण, यावेळी नागरिकांना कोरोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...