आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी येथील बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणऋषी म. शं. शिवणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी शहरात अभिवादन सोहळा पार पडला. माजी मुख्याध्यापक व शिवणकरांचे सहकारी राहिलेले वि. म. औंढेकर अध्यक्षस्थानी होते. सरस्वती पूजन व शिवणकरांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने अभिवादन सोहळ्याचे उद्घाटन झाले. या वेळी उपस्थित गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रा. व्ही. जी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
के. डी. अडणे, डी. व्ही. राके यांनी मनाेगत व्यक्त केले. म. शं. शिवणकरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून कृती आराखडा डिसेंबर २०२३ पर्यंत तयार करण्यात येईल. डिसेंबर २०२४ पर्यंत या आराखड्याची संकल्पपूर्ती करून २४ डिसेंबर २०२४ रोजी १०० व्या जन्मदिनाचा भव्य सोहळा परभणी येथे होणार आहे. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा राऊतमारे हिने आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.