आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन; भगवे फेटे, पारंपारिक वेषभूषेत बुलंद छावाची वाजत- गाजत शोभायात्रा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त बुलंद छावा मराठा युवा परिषद प्रणित उत्सव समितीतर्फे शनिवारी सकाळी टीव्ही सेंटर चौकपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद‌्घाटन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार अतुल सावे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिभाऊ बागडे, पृथ्वीराज पवार, अभिजित देशमुख, कैलास पाटील, डॉ. कल्याण काळे, माजी महापौर नंदू घोडेले, उपकार्यकारी अभियंता विठ्ठल गावंडे यांची उपस्थिती होती. शोभायात्रेत महिलांनी पारंपरिक फुगडी, पावल्यांचे सादरीकरण केले. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी बुलंद छावाचे सुरेश वाकडे, सतीश वेताळ, मनोज गायके, साहेबराव मुळे, संदीप बोरसे, प्रा. चंद्रकांत भराट, बाळासाहेब थोरात, शिवाजी दांडगे, सुनील मानकापे, संदीप चव्हाण, राजू शिंदे, श्याम देशमुख, बाबासाहेब साबळे, विलास उबाळे, प्रशांत पाटील, विक्रमसिंग पवार, गणपतराव म्हस्के, उल्हास चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर जाधव, भरत अहिरे, गणेश तुपे, अमोल मानकापे, धृपत निकम, रामेश्वर राजगुरे, योगेश देशमुख, अनिल तुपे, प्रदीप हारदे, दिलीप जाधव, विलास पवार, सुरेश बोर्डे, बाबू चौधरी, रतन काळे, शिवाजी भिंगारे, विजय साखळे, किशोर विटेकर, संदीप जाधव, संदीप शेळके, गोरखनाथ जाधव, गणेश जाधव, दादासाहेब जाधव, सारंगधर जाधव, रवी गायके, सतीश सोनवणे, अभिजित काकडे, रवींद्र नीळ, योगेश निकम, वैभव वेताळ, उमेश वाकडे आदींनी सहकार्य केले. १५ मे रोजी ‘अशी आमची माय मराठी’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मधुरा लॉन्स, जुन्या जकात नाक्याजवळ, जळगाव रोड, हर्सूल येथे सायंकाळी ६.३० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अभिजित देशमुख, सतीश मेटे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीतर्फे जिल्हाध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सदाशिव पाटील, मोहंमद बशीर, सुनील भालेराव, सहसचिव संजय नांगरे, ज्ञानेश्वर बोरसे, प्रवीण हिवाळे, आशिष शिसोदे, राहुल झिंजाडे, सुलेमान चाऊस, झिशान नेहरी, अभिषेक सत्राळकर, जनार्दन साबळे, राज पटेल, आशिष शिसोदे, कदम, रिझवाना मुश्ताक शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...