आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेकानंद शिक्षण संस्था संचालित मराठा हायस्कूल, चौराहा येथे ७ जानेवारीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ पाटील शिसोदे ऊर्फ भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीमंतराव शिसोदे हाेते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय शिसोदे, सहसचिव डॉ. यशोद शिसोदे, विद्या समिती सचिव सुहास मडके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राघवेंद्र यत्नाकर, रामचंद्र दरक, मुख्याध्यापक डॉ. रूपेश मोरे, मुख्याध्यापिका प्रांजली दाशरथे यांची उपस्थिती होती.
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरशालेय स्पर्धेतून यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. विजया सपकाळ यांनी सूत्रसंचालन, अशोक उगले यांनी आभार मानले. मंगल पवार, रवींद्र माळी, शिवाजी पठाडे, सुनील लंगडे, राजेंद्र नेरकर, राजश्री तौर, संगीता उगले आदी उपस्थित होते.
दीनदलितांसाठी सुरू केली शिक्षणाची गंगा
डॉ. प्रा. यशोद शिसोदे यांनी सांगितले की, पंढरीनाथ शिसोदे ऊर्फ भाऊ यांनी दीन दलितांच्या त्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनास आकार व समृद्ध करण्यासाठी सहकार तथा शिक्षणाची गंगा आणण्याचे काम केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.