आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामन्यांना धडाकेबाज सुरुवात:जीएसटी सहआयुक्त जी. श्रीकांत, उद्योजक सचिन मुळे यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडाप्रेमी तसेच बांधकाम व्यावसायिक आयकॉन कपची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर एमजीएम क्रिकेट मैदानावर या भव्य सामन्यांचा शुभारंभ मंगळवारी जल्लोषात जीएसटी सहआयुक्त जी. श्रीकांत, उद्योजक सचिन मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

या शुभारंभाप्रसंगी जी. श्रीकांत म्हणाले की, आयकॉन स्टील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या खेळांडूसाठी दरवर्षी उत्साहाने या कपचे आयोजन करते. बांधकामामध्ये सळईसोबत इतर साहित्य एकमेकांशी जोडलेले असते अगदी त्याचप्रमाणे आयकॉन कपनेदेखील बांधकाम क्षेत्रातील खेळाडूंचे घट्ट नाते तयार केले आहे. मोठ्या तयारीने सर्व संघ या कपमध्ये सहभागी झाले असून सर्वांनी विजयी चषक पटकावण्यासाठी कंबर कसली आहे. याप्रसंगी बोलताना सचिन मुळे म्हणाले, मोठ्या आतुरतेने आम्ही सर्व खेळाडू आम्ही आयकॉन कपची वाट पाहत असतो. आयकॉन नेहमीच क्रीडाप्रेमींचा उत्साह वाढवण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करतात.

एमजीएम मैदानावर आयकॉन चषक क्रिकेट स्पर्धेत एबीसीए, ईसीईपी व आयकॉन इलाइट संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात केली. पहिल्या लढतीत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरने १२ षटकांत ७ बाद ८७ धावा केल्या. त्यांच्याकडून अभय भोसलेने ३५ धावांचे योगदान दिले. विठ्ठल कुमावत, सय्यद नबी आणि नितीन करोडीवाल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एबीसीए संघाने विजयी लक्ष्य ४ गडी गमावून गाठले. सागर (३६) व नितीन (३८) यांनी योगदान दिले. मिहिर मुळेने २ गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...