आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांची शिफारस:सर्व प्रकारच्या ऑनलाइन गेम्सवर यापुढे 28% पर्यंत जीएसटी शक्य, सध्या आकारला जातो 18% जीएसटी

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलॉइन गेमिंगवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून आता २८ टक्के करण्याची शिफारस अर्थ मंत्र्यांचा गट करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कौशल्य आधारित असो किंवा चान्स गेम, सर्व प्रकारच्या ऑनलाइन गेमिंगवर समान दर आकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जीएसटीच्या गणनेच्या फॉर्म्युल्यामध्येही बदल होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. सध्या जीएसटी ऑनलाइन गेमिंग पोर्टलकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या संपूर्ण महसुलावर १८ टक्के दराने जीएसटी आकारला जातो. सूत्रांनी सांगितले की, मंत्री गटाचा अहवाल तयार असून तो लवकरच जीएसटी परिषदेला पाठवला जाऊ शकतो. मंत्री गटाच्या मागल्या अहवालामध्ये २८ टक्के जीएसटीची शिफारस करण्यात आली होती. तथापि, त्यांनी कौशल्य किंवा चान्स गेमच्या आधारे यात फरक केला नव्हता. या अहवालावर फेरविचार करावा, असे जीएसटी परिषदेने मंत्री गटाला म्हटले होते. यानंतर परिषदेने अॅटर्नी जनरल यांच्यासोबत सल्लामसलत केले आणि ऑनलाइन गेमिंग इंडस्ट्रीशी संबंधित लोकांची बाजूही ऐकून घेतली. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, २८ टक्के जीएसटी खूप जास्त आहे. ती युजरला वैधानिकदृष्ट्या कर अदा करणाऱ्या पोर्टलपासून दूर घेऊन जाईल आणि बेकायदेशीर पोर्टलला प्रोत्साहित करेल. त्यामुळे ती कमी असावी.

बातम्या आणखी आहेत...