आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:मसोड पाटीजवळ वाहनांचा ताफा थांबवून पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड आणि खासदार अॅड राजीव सातव यांनी जखमींना केली मदत

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपचारासाठी पोलीस वाहनाने कळमनुरी च्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले

कळमनुरी ते हिंगोली मार्गावर मसोड पाटीजवळ गुरुवारी (ता. ९) सायंकाळी ५ वाजता अपघातग्रस्त वाहन दिसताच पालकमंत्री वर्षा गायकवाड व खासदार राजीव सातव यांनी वाहनांचा ताफा थांबवून दोन जखमींना तातडीने उपचारासाठी पोलीस वाहनाने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यामुळे जखमींना तातडीची आरोग्यसेवा मिळू शकली.

हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड दोन दिवसांच्या हिंगोली दौऱ्यावर आहेत  आज सकाळी त्या  नांदेड येथे आल्या. त्यानंतर आखाडाबाळापुर मार्गे कळमनुरी येथे येऊन खासदार अॅड. राजीव  सातव यांच्या निवासस्थानी भेट दिली.  त्यानंतर पालकमंत्री प्रा. गायकवाड व खासदार अॅड.  सातव  हिंगोली कडे निघाले होते. सायंकाळी पाच वाजता त्यांच्या वाहनांचा ताफा कळमनुरी येथून हिंगोली कडे येत होता. 

यावेळी हिंगोली येथून कळमनुरी कडे श्रीनिवास बाजीराव पाईकराव (  20 ) व बाजीराव महादू पाईकराव ( ५० , दोघे रा. कळमनुरी) हे दोघेजण त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोली येथून कळमनुरी कडे जात होते.  त्यांचे दुचाकी वाहन मसोड पाटीजवळ आले असताना त्यांच्या वाहनावर अचानक एका वानराने  उडी मारली. त्यामुळे श्रीनिवास पाईकराव यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोघेही ही रस्त्याच्या बाजूला पडले. सदर प्रकार तेथून जाणाऱ्या पालकमंत्री प्रा. गायकवाड व खासदार अॅड. सातव यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाहनांचा ताफा थांबवला. वाहनातून खाली उतरून त्यांनी  दोन्ही जखमींची विचारपूस करून त्यांना धिर दिला. त्यानंतर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची संपर्क साधून अपघाताची माहिती दिली.. तसेच या दोन्ही जखमींना उपचारासाठी पोलीस वाहनातून कळमनुरी येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पालकमंत्री प्रा. गायकवाड व खासदार अॅड. सातव  यांच्या सतर्कतेमुळे अपघातातील जखमी झालेल्या दोघांनाही तातडीची आरोग्यसेवा मिळाली आहे. अपघातातील जखमींना मदत मिळाल्याने पाईकराव कुटुंबीयांनी पालकमंत्री प्रा. गायकवाड व खासदार अॅड. सातव यांचे आभार मानले

0