आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Guardian Minister's Decision 2000 Water Taps Waived In Aurangabad Which Gets Water Once In Eight Days, Attempt To Reduce Public Unrest Before Municipal Elections

दिव्य मराठी इम्पॅक्ट:पालकमंत्र्यांचा निर्णय - आठ दिवसांतून एकदा पाणी मिळणाऱ्या औरंगाबादेत 2000 रुपये पाणीपट्टी माफ

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या औरंगाबादकरांमध्ये मनपा व राज्य सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. गेल्या महिनाभरापासून आंदोलनेही केली जात होती. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक ४०५० रुपये पाणीपट्टी भरुनही शहरात वर्षातून फक्त ५५ दिवसच पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे एक तर रोज पाणी द्या अन्यथा पाणीपट्टी निम्म्याने कमी करा, अशी मागणी जोर धरत होती. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत रोज पाणी देणे मनपाला शक्य नाही. त्यामुळे अखेर मनपा निवडणुकीच्या तोंडावर जनक्षोभ कमी करण्यासाठी २००० रुपये पाणीपट्टी कमी करण्याचा निर्णय पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी घेतला. या निर्णयामुळे शहरातील सुमारे सव्वालाख अधिकृत नळधारकांचे २५ कोटी रुपये यावर्षीपासून वाचणार आहेत.

औरंगाबादेची पाणीपट्टी राज्यात सर्वात महाग
प्रकाश टाकला होता. १३ मेच्या अंकात राज्य सरकारने दरवर्षी ५४ कोटी रुपये दिले तर पाणीपट्टी ५० टक्क्यांनी कमी करणे शक्य आहे, याबाबत वृत्त प्रकाशित करुन शासन व प्रशासनाचे लक्षही वेधले होते. अखेर वाढता जनक्षोभाची दखल घेऊन पालकमंत्र्यानंी पाणीपट्टी दोन हजार रुपयांनी कमी करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.

स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग आदी उपस्थित होते. या बैठकीत पाणीटंचाई दूर करण्यासाठी मनपा ४२ मुद्द्यांच्या आधारे करत असलेल्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्र्यांना देण्यात आली. त्यावर समाधान व्यक्त करत शहराला समान पाणीवाटप करा, अशी सूचनाही केली. एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीत सवलतीचा निर्णय लागू होईल, या आठवड्यात प्रशासक हा ठराव शासनाकडे पाठवतील. त्यांच्या मंजूरीनंतरच हा निर्णय लागू होईल.

समन्वयासाठी समिती : किमान पाच दिवसाआड व सर्वांना समान पाणी मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती नेमली आहे. ते रोज पाणीपुरवठ्यावर देखरेख करतील. आठ दिवसांनी मी पुन्हा आढावा घेणार आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले.

‘समांतर’ने वाढवला बाेजा : समांतर योजनेतून दररोज २४ तास पाणी देण्याचे आश्वासन देऊन मनपाने २०१०-११ मध्ये पाणीपट्टी १८५० वरून थेट ४०५० रुपये केली. ही योजना तर झालीच नाही, पण वाढीव पाणीपट्टीचा बाेजा मात्र कायम राहिला. पण आधीचे नियम रद्द करता येणार नाहीत, असे म्हणत मनपा पाणीपट्टी कमी करत नव्हती.

औरंगाबादेची पाणीपट्टी राज्यात सर्वात महाग
शहर पाणी पट्टी पाणी पुरवठा
जळगाव ~ २००० एक दिवसाआड
सोलापूर ~ १५०० चार दिवसाआड
नगर ~ १५०० एक दिवसाआड
नाशिक ~ १२०० दररोज
जालना ~ २२०० आठ दिवसाआड
अकोला ~ १४४० चार दिवसाआड
औ.बाद ~ ४०५० आठ दिवसाआड

‘समांतर’ने वाढवला बाेजा
समांतर योजनेतून दररोज २४ तास पाणी देण्याचे आश्वासन देऊन मनपाने २०१०-११ मध्ये पाणीपट्टी १८५० वरून थेट ४०५० रुपये केली. ही योजना तर झालीच नाही पण वाढीव पाणीपट्टीचा बाेजा मात्र कायम राहिला. पण आधीचे नियम रद्द करता येणार नाही, असे म्हणत मनपा पाणीपट्टी कमी करत नव्हती.

बातम्या आणखी आहेत...