आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयजे खासदार चषक क्रिकेट स्पर्धा:गुड्डू ईएमआय 21 संघाचा सलग दुसरा विजय; सान्या युनायटेडचा पराभव

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनर्फे आयोजित आयजे क्रीडा महोत्सव अंतर्गत खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी गुड्डू ईएमआय 21 संघाने शानदार विजय मिळवला. आमखास मैदानावर झालेल्या सामन्यात गुड्डूने सान्या युनायटेड संघावर 4 गड्यांनी मात केली. लढतीत शेख यासेर शेख सामनावीर ठरला. गुड्डू संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला, तर सान्या युनायटेडचा हा सलग दुसरा पराभव आहे.

नाणेफेक जिंकून गुड्डू संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सान्याने 15 षटकांत 8 बाद 125 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिजित भगतने 12 धावा केल्या. ऋषिकेश तरडे भोपळाही फोडू शकला नाही. कर्णधार स्वप्निल चव्हाणने 25 चेंडूंत 3 चौकारांसह 26 धावा केल्या. मधुर पटेलने 24 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचत 31 धावा ठोकल्या. राहुल शर्माने 14 चेंडूंत फटकेबाजी करत 2 चौकार व 2 षटकारासह 27 धावा जोडल्या. नितीन फुलानेने 10 धावा केल्या. प्रविण कुलकर्णी शुन्यावर बाद झाला. शुभम मोहिते 6 धावांवर नाबाद राहिला. गुड्डूकडून जेकेने 3 षटकांत 30 धावा देत 3 गडी बाद केले. माजीद खानने 16 धावांत 2 आणि कर्णधार मुस्तफा शाहने 24 धावांत 2 बळी घेतले.

यासरचे शानदार अर्धशतक

प्रत्युत्तरात गुड्डू संघाने 14.3 षटकांत 6 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर युनुस पठाणने 18 आणि यष्टिरक्षक फलंदाज खालेद कादरीने 16 धावा केल्या. शेख यासरने 37 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 59 धावांची विजयी खेळी केली. तो दुसऱ्यांदा सामनावीर ठरला. भास्कर जिवगर अवघ्या 1 धावांवर तंबूत परतला. एस.के. अतीफने 11 धावा जोडल्या. आकाश विश्वकर्माने 9 धावांचे योगदान दिले. सान्याकडून प्रविण कुलकर्णीने 2.3 षटकांत 32 धावा देत 3 गडी बाद केले. शुभम मोहिते, स्वप्निल चव्हाण व नितिन फुलानेने प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...