आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनाप्रणीत गुढीपाडवा महोत्सवाच्या शोभायात्रेचे निमंत्रण धुडकावत भाजपने शहरात स्वतंत्रपणे उत्सव साजरा केला. शहरातील आठ विभागांत पक्षाच्या वतीने गुढ्या उभारण्यात आल्या. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आ. अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आठही ठिकाणी हजेरी लावत कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. पदमपुरा येथील मामा चौकात भाजपने सर्वात मोठी तीस फुटांची गुढी उभारली.
जवाहर कॉलनी, विष्णुनगर येथे शंकरअण्णा म्हात्रे, नंदू गवळी यांनी गुढी उभारली. गुलमंडीवर दयाराम बसैये बंधू, राजेश मेहता यांनी पाडव्याचे आयोजन केले. मामा चौक येथे मनदीप राजपूत, शंतनू उरेकर, बाळू देवतवाल यांनी पुढाकार घेतला. गारखेडा येथील आ. अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर लक्ष्मीकांत थेटे यांनी आयोजन केले होते. दशमेशनगर येथे राजू पाटील, अजय शिंदे, सातारा परिसरातील पोलिस स्टेशन रोडवरील चौकात प्रवीण कुलकर्णी व ज्ञानेश्वर बोर, छावणी पडेगावात दीपक ढाकणे, नीलेश धारकर यांनी आयोजन केले. चिकलठाणा येथे मदन नवपुते, रवी कावडे यांनी गुढी उभारली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.