आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:हिंदी विद्यालयाच्या मुलींना ‘गुड टच बॅड टच’वर मार्गदर्शन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शाळा-महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंकडून मुलींना टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे. हे राेमिओ शाळा परिसर व प्रवेशद्वारासमोर उभे राहून छेडछाड करतात. या प्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने औरंगाबाद शहर पोलिस विभागामार्फत शाळा-महाविद्यालयांत जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयात सिटी चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊन गुड टच बॅड टचवर मार्गदर्शन केले.

हा उपक्रम मुख्याध्यापक रवींद्र तायडे, पर्यवेक्षक संध्या कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या वेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या शंका-कुशंकांचे गांगुर्डे यांनी निरसन केले. पोलिस विभागाचे रायटर ओमप्रकाश बनकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास काळे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...