आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारणा:मसिआतर्फे मोशन लॉसविषयी मार्गदर्शन; महिला उद्योजकांसाठी खास प्रबोधन सुरू

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मसिआच्या महिला उद्योजक सेलतर्फे महिला उद्योजकांसाठी ‘इंडस्ट्रियल सेव्हन लॉस अँड मॅनेजमेंट’ या महत्त्वपूर्ण विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून त्याचा पहिला टप्पा म्हणून ‘मोशन लॉस’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी टीपीएम तज्ज्ञ जयंत यावलकर आणि सलील पेंडसे यांनी उपस्थित महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले. हा शोधून तो कमी कसा कारावा, त्यात सातत्याने सुधारणा कशी करावी आणि उत्पादकता कशी वाढवावी याविषयी त्यांनी माहिती दिली. सेलच्या ५० महिला उद्योजक सदस्या यात सहभागी झाल्या होत्या.

गेल्या वर्षी टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमधील वन-एस व टू-एस यावर महिला उद्योजकांसाठी सेमिनार, प्रशिक्षण तसेच स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यास उद्योजक महिलांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने या वर्षी इंडस्ट्रियल ‘सेव्हन लॉस अँड मॅनेजमेंट’ या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. मसिआच्या अनिल विश्वासराव चव्हाण सभागृहात या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसिआचे अध्यक्ष किरण जगताप होते. मसिआ महिला उद्योजक सेलच्या संयोजिका रत्नप्रभा शिंदे यांच्यासह साठ महिला उद्योजक उपस्थित होत्या.

मोशन लॉस निर्मूलन स्पर्धा १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मसिआच्या वतीने मोशन लॉस निर्मूलनाची स्पर्धा घेण्यात येणार आहे. मसिआ महिला उद्योजक सेलच्या सदस्यांनी आपल्या इंडस्ट्रीत यावर केलेल्या कामासह या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पेंडसे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...