आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

77 वा शेतकरी - शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम:पिकांवरील कीड, रोगाचा प्रादुर्भावावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शास्त्रज्ञांनी सूचवले उपाय

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विज्ञान केंद्रात 1 ऑगष्ट रोजी 77 वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम पार पडला. कृषी शास्त्रज्ञानी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमांद्वारे पिकांवरील कीड रोगाचा प्रादुर्भाव व उपाय योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.प्राध्यापक डॉ.दिगंबर पटाईत, वनस्पती रोगशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. डि. जी. हिगोंले, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजुला भावर व इतर शास्त्रज्ञ, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये कापूस, मका, सोयाबीन, तूर पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयावर बोलतांना डॉ. पटाईत म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रमुख पिकांपैकी कापुस हे नगदी पीक आहे. या पिकांवर सर्वांत जास्त प्रमाणात प्रादूर्भाव हा शेंदरी गुलाबी बोंडअळीचे आढळतो. तसेच सद्यस्थितीत ढगाळ वातावरण, पावसाची उघडझाप यामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.

या रस शोषण किडींच्या उद्रेकामागील प्रमुख कारणे म्हणजे बीटी कपासींचा फवारणीमध्ये करण्यात आलेला बदल, इमिडाक्लोप्रीड या किटकनाशकाप्रति किडींमध्ये निर्माण झालेली प्रतिकारशक्ती, एकापेक्षा अधिक किटकनाशके, विद्राव्य खते, बुरशीनाशके इत्यादींचा मिश्रण करुन फवारणी करणे, नत्रयुक्त खतांचा अवाजवी वापर, किटकनाशकांचा अवाजवी फवारण्या व प्रमाण, किडींसाठी असलेले पोषक वातावरण ही आहेत.

यावेळी बोलतांना त्यांनी कपाशीवरील किडींच्या व्यवस्थापनासाठी लागणारी कीटकनाशके तसेच कपाशीवरील तुडतुडे, मावा, फुलकिडे यांसारख्या रस शोषण करणा-या किडींच्या व्यवस्थापनाबद्यल उपस्थित शेतक-यांना माहिती दिली. तर डॉ. हिंगोले म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये कापुस, मका, मोसंबी, टोमॅटो, मिरची व इतर खरिप पिकावर ढगाळ वातावरणामुळे रोग वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी वेळीच पावले उचलने गरजेचे आहे. भारी जमिनीत निचरा नसल्याकारणाने पिकांमध्ये मुळकुज होण्याची शक्यता जास्त असते. यावेळी त्यांनी या पिकांमध्ये उदभवणा-या रोगांच्या व्यवस्थापन बद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.किशोर झाडे, सूत्रसंचालन केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, तर आभार डॉ.संजूला भावर यांनी मानले. शास्त्रज्ञांव्दारे शेतक-यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेतील शास्त्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...