आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयाेजन:आयपीएलमध्ये गुजरातची यंदा सर्वाधिक 5.18 काेटींची कमाई; मुंबईला 4.53 काेटींचा फायदा

छत्रपती संभाजीनगर / एकनाथ पाठक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांची कमाई करताना दिसते. याशिवाय काेट्यवधी रुपयांच्या स्वरूपात आपल्या संलग्न राज्य संघटनांनाही निधी दिला जाताे. यामुळे बीसीसीआयपाठाेपाठ राज्य संघटनांनाही आयपीएलमुळे आर्थिक फायदा हाेताे. तसेच बीसीसीआयची भरपूर कमाई होते. बीसीसीआयच्या कमाईचा हिस्सा राज्य संघटनांना मिळतो. बीसीसीआय प्रत्येक सामन्यासाठी राज्य संघटनेला ६४ लाख ८० हजार रुपये देते.

यंदा १६ व्या सत्राच्या आयपीएलचे सामने देशभरातील १२ माेठ्या शहरामधील स्टेडियमवर आयाेजित करण्यात आले. म्हणजेच बीसीसीआयकडून एकूण ४५ कोटी ३६ लाख रुपये राज्य संघटनांना ७१ सामन्यांच्या (प्लेऑफ वगळून) आयाेजनासाठी देणार आहे. गुजरात स्टेट असोसिएशन यंदाच्या सत्रात सर्वात श्रीमंत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ८ सामने होणार आहेत. याच आयाेजनापाेटी संघटनेला सर्वाधिक ५.८४ काेटी रुपये मिळणार आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि लखनऊला प्रत्येकाला ४.५३ काेटी रुपये मिळणार आहेत. गुवाहाटी आणि धर्मशाला स्टेडियम प्रत्येकी १.२९ काेटींचे मानकरी ठरले आहेत.

इकानाची पदार्पणात ४.५३ काेटींची कमाई : लखनऊमध्ये यूपी क्रिकेट असोसिएशनचे इकाना स्टेडियम आहे. हे प्रथमच आयपीएलचे सामने आयोजित करत आहे. या स्टेडियममध्ये ७ सामने खेळवले जातील. त्यामुळे या स्टेडियमला ४ कोटी ५३ लाख ६० हजार रुपये मिळणार आहेत. बीसीसीआयने आसाम असोसिएशनच्या गुवाहाटी आणि हिमाचल प्रदेश असोसिएशनच्या धर्मशाला यांना प्रथमच आयपीएल सामना आयोजित करण्याची संधी दिली. गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियम हे राजस्थान रॉयल्सचे या हंगामात दुसरे होम ग्राउंड आहे तर धर्मशाला हे पंजाब किंग्जचे दुसरे होम ग्राउंड आहे.