आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:कविता, पोवाडा, एकपात्री प्रयोगातून गुरव समाज महिला मेळावा उत्साहात

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरव समाज महिला मेळाव्यात वैशाली गुरव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तसेच कविता चौधरी यांनी स्त्रीशक्तीवर आधारित कवितांचे सादरीकरण केले. संगीता खंडाळकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर एकपात्री प्रयोगातून महिला मेळावा झाला.मौलाना आझाद संशोधन केंद्रात महिला मंडळाच्या अध्यक्षा क्षमा गोरक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.

मनीषा गडकरी व कविता राजपूत यांनी गणेशवंदना नृत्य सादर केले. अनिता सोनवणे यांनी कविता सादर केली. या वेळी सासू- सुनांनी मनोगते व्यक्त केली. सोन्ने गुरुजी, दैवत वृद्धाश्रमाच्या संचालिका उमा तुपे, ज्योती दांडगे, डॉ. जयश्री काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.मे महिन्यात होणाऱ्या सामूहिक विवाह व मुंजीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने अत्यल्पसंख्याक गुरव समाजाच्या युवकांसाठी संत काशीबा महाराजांच्या नावाने महामंडळ सुरू करण्यात आला. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच यासाठी पाठपुरावा करणारे माजी आमदार विजयराज शिंदे यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. या वेळी दामिनी पथकाच्या पीएसआय अनिता फसाटे, निर्मला निंभोरे, अंमलदार मनीषा बनसोडे यांनी मेळाव्यात मांडलेली मनोगते प्रेरणादायी ठरली.

बातम्या आणखी आहेत...