आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहडकोतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या याग सप्ताहाला १ डिसेंबर रोजी सुरुवात झाली आहे. सकाळी हडको एन-९ येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात ९०० महिलांच्या उपस्थितीत गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. या वेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत होमहवनामध्येही सहभाग घेतला. दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व अाध्यात्मिक विकास मार्ग संस्थेच्या माध्यमातून होत आहे. श्री दत्त जयंतीनिमित्ताने सकाळी ८ ते १० या वेळेत ९०० महिलांनी एकाच वेळी पारायणाला सुरुवात केली.
महिलांनी केले मंडळ पूजन: सकाळी कुसुमताई डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य स्वाहाकार मंडळ स्थापना करण्यात आली. या वेळी ९ कलशांची स्थापना करण्यात आली. यात मातृका मंडळ, चंडी मंडळ, प्रधान कलश, ब्रह्मदेव स्थापना, रुद्र कलश, वास्तू कलश, क्षेत्रपाल कलश मंडळ स्थापना केली. कल्पना पाटील, हेमलता वाणी, चारूलता नेमाडे, वैशाली पैठणकर, उज्ज्वला चांदवडकर, कल्पना पाटील यांची उपस्थिती होती. यानंतर महिलांनी होमहवनासाठी अग्नी प्रज्वलित केला.
महिला मंत्रोच्चारात करणार याग
कार्यक्रमात प्राणप्रतिष्ठा, अग्निप्रज्वलन, नित्य स्वाहाकार आणि होमहवन महिलाच करणार आहेत. दहा महिलांचा सहभाग असणार आहे. कल्पना पाटील, सेवेकरी
संस्कृतीचे जतन होणे आवश्यक
दरवर्षी मंदिरात याग होतो.यात महिला सुवासिनी शृंगार करून येतात. त्यामुळे मंदिरात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. पौराेहित्यही महिला करतात. रंजना तारू, सेवेकरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.