आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श शिक्षक पुरस्कार:गुरुजींचा सन्मान तिसऱ्यांदा लांबणीवर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपाने दोनवेळा आदर्श शिक्षक पुरस्कार वाटपाचे नियोजन केले. मात्र, आता २६ जानेवारीला पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते हे पुरस्कार वाटप करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू होत्या. परंतु, त्यातही शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा आला आहे. त्यामुळे गुरुजींचा सन्मान आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेतर्फे दरवर्षी शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. कोरोनाकाळात त्यात खंड पडला होता. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने यंदा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाईल, अशी शिक्षकांना अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. नंतर प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवून घेण्याचे आदेश देत १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी पुरस्कार दिले जातील, असे जाहीर केले होते. परंतु, १७ सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण झाले नाही. नंतर ३ जानेवारी रोजी पुरस्कार वाटपाचे नियोजन केले. तो मुहूर्तही हुकला. आता २६ जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, आता त्यातही शिक्षक निवडणुकीचा आचारसंहितेचा अडथळा आला आहे.

बातम्या आणखी आहेत...