आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांच्या आकलनाचे मूल्यमापन करणारे शिक्षक स्वत:च्या परीक्षेत नापास होत असल्याचे दिसून आले होते. आता, पहिल्या पसंतीचा १ आणि दुसऱ्या पसंतीचा २ हे आकडे टाकण्यातही त्यांनी गफलती केल्याचे पुढे आले. मते बाद होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगासह प्रत्येक उमेदवाराने, पक्षांनी खास प्रशिक्षण घेऊनही २,४८५ म्हणजे तब्बल ५ टक्के मते बाद झाली. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या प्रचारात निर्णायक राहिलेली जुनी पेन्शन योजना मतपत्रिकेवरही उमटली. काही शिक्षक मतदारांनी मतपत्रिकेवरच जुनी पेन्शन योजना हवी ही मागणी स्वाक्षरीसह टाकून आपले मत बाद केले.
गेल्या निवडणुकीत १८०० शिक्षकांची मते बाद झाली होती. त्यावरून मोठी टीका झाली होती. त्यामुळे या वेळी प्रचार मेळाव्यांमध्ये मतपत्रिका कशी भरायची, मते बाद कशी होणार नाहीत याची दक्षता कशी घ्यायची याचे विशेष प्रशिक्षण दिले होते. निवडणूक आयोगानेही पेनने कसे लिहावे इथपासून या मतदानात शिक्षकांना दिले होते. तरीही ५ टक्के मते बाद झाल्याने हे अनवधनाने झाले की रणनीती म्हणून, अशी चर्चा सुरू झाली आहे.
मते बाद होण्याची हीदेखील कारणे : मतपत्रिकेवर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे आकडे टाकणे अपेक्षित असताना शिक्षकांनी नावांसमोर बरोबरची खूण केली होती. काहींनी एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे एकच क्रमांक लिहिला होता.
मतपत्रिकेवरही ‘पेन्शन द्या’ लिहून केला निषेध
या वेळी बाद मतांमध्ये मोठ्या संख्येने जुनी पेन्शन लागू करा ही मागणी लिहून स्वाक्षरी करून मते जाणीवपूर्वक बाद करण्याचा नवीन प्रकार पाहायला मिळाला. एका मतदाराने मी गेल्या दहा वर्षांपासून काम करतो, मात्र विनाअनुदानित शाळा असल्याने पगार मिळत नसल्याची व्यथा मतपत्रिकेवर लिहिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.