आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निथाॅन चषक क्रिकेट स्पर्धा:गुरूकुल अकादमीने सीके संघाला हरवले; पौरुष मिसाळ ​​​​​​​ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री तालुक्यातील पाल येथील एचएसजे स्टेडियमवर सुरू असलेल्या निथॉन वनडे क्रिकेट चषक स्पर्धेत गुरुकुल क्रिकेट अकादमीने विजय मिळवला. रविवारी झालेल्या लढतीत गुरूकुलने सीके संघाला 8 गडी राखून पराभूत केले. अर्धा डझन फलंदाज बाद करणारा पौरुष मिसाळ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सीके संघाचा डाव 25.5 षटकांत अवघ्या 125 धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर फलंदाज विराज घुगे भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्याच षटकारच्या अखेरच्या चेंडूवर अतिश गावंडेने त्याचा त्रिफळा उडवला. सलामीवीर जीत राजपूतने 19 चेंडूंत 14 धावा केल्या. व्योम खर्चेने एकाकी लढत देत 62 चेंडूंत 8 चौकार खेचत सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. व्योम व मितने तिसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भागीदारी केली.

कर्णधार मीत रोहराने 35 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचत 26 धावा काढल्या. त्यानंतर ओम कासलिवाल व अर्थव तोतला सलग दोन चेंडूंवर शुन्यावर बाद झाले. करणराज सिंग जग्गीने 6 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार मारत 17 धावा ठोकल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. गुरूकुलच्या पौरुष मिसाळने 9 षटकांत 32 धावा देत 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 2 षटके निर्धाव टाकली. अतिश गावंडेने 2 आणि आरिनने एक बळी घेतला.

अतिषची अष्टपैलू कामगिरी

प्रत्युत्तरात गुरूकुल अकादमीने 19.4 षटकांत 2 गडी गमावत 128 धावा करत विजय मिळवला. गोलंदाजातीत चमकदार कामगिरी केल्यासनंतर फलंदाजीत सलामीला आलेल्या अतिष गावंडेने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 65 चेंडूंचा सामना करताना 10 सणसणीत चौकार खेचत नाबाद 48 धावांची अर्धशतकी विजयी खेळी केली. दुसरा सलामीवीर स्वराज चिटणीस 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार रबमित सिंग सोधीने 45 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत 45 धावा ठाेकल्या. त्याला समर्थ तोतलाने त्रिफळाचित केले. आदित्य बागुल 4 धावांवर नाबाद राहिला. संघाला 27 धावा अतिरिक्त मिळाल्या. सीकेकडून अर्थव तोतला व समर्थ तोतलाने प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

बातम्या आणखी आहेत...