आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्कराची कार घेतली ताब्यात:औरंगाबादेत गुटखा तस्कराला 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी; सुमारे पावणेआठ लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद कारमधून अवैधरित्‍या गुटख्‍याची विक्री करणाऱ्या एकाच्‍या रविवारी पहाटे गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने मुसक्या आवळल्या. त्‍याच्‍या‍ ताब्यातून कारसह गुटखा व पान मसाला असा सुमारे 7 लाख 64 हजार 148 रुपयांचा ऐवज हस्‍तगत केला.असून त्याला 21 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ऋषभ दिनेश जैन पाटोदी (22, रा. एन-11, रविनगर हडको) असे आरोपीचे नाव असून त्‍याला 21 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी दिले.

गुन्‍हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके हे आपल्या पथकासह 18 जून रोजी रात्री परिमंडळ हद्दीत गस्‍त घालत होते. त्‍यावेळही रवी नगर हडको परिसरातील मातोश्री मेडीकल समोर कारमध्‍ये (क्रं. एमएच-12-जेएक्स 9990) एक व्‍यक्ती गुटखा, पान मसल्याची विक्री करण्‍यासाठी येणार असल्याची माहिती शेळके यांच्‍या पथकाला मिळाली. माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीन ऋषभ जैन पाटोदी याच्‍या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी कारच्‍या डीक्कीतून गुटखा व पान मसाला असलेल्या प्‍लास्‍टीकच्‍या पाच गोण्या, मधल्या सिटीवरुन एक गोणी व बॉक्स आणि कार असा सुमारे 7 लाख 64 हजार 148 रुपयांचा ऐवज जप्‍त केला. आरोपीची चौकशी केली असता, गुन्‍ह्यात वापरलेलीकारही सचिन भंगड यांची असल्याचे त्‍याने सांगितले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता सहायक सराकरी वकील निता किर्तीकर यांनी आरोपीने गुटखा कोठून व कोणाकडून आणला. आरोपीचा साथीदार सचिन भंगड याला अटक करायची आहे. गुन्‍ह्यात आणखी कोणा कोणाचा सहभाग आहे याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...