आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:टपरीचालकांना देण्यापूर्वीच 21 लाखांचा गुटखा जप्त, मुकुंदवाडी भागात गुन्हे शाखेची पहाटे सहा वाजता कारवाई

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरानगर, मुकुंदवाडीत राजपूत क्लिनिकजवळ दोन मजली घरात राहणाऱ्या ३६ वर्षीय शेख हबीब शेख मदनने जालन्याहून २१ लाखांचा गुटखा आणला. शेख यासीन शेख फत्तू (४३), मोहसीन खान मुमताज खान (२५) या भागीदारांच्या मदतीने तो मंगळवारी (५ एप्रिल) सकाळी सहा वाजता टपरीचालकांकडे पोहोचवण्यासाठी ठरवले. त्यासाठी कारही तयार ठेवली होती. पण खबऱ्याने गुन्हे शाखेच्या पथकाला अचूक टीप दिली. सहा वाजण्यास काही मिनिटे बाकी असताना छापा टाकत पथकाने या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके, सहायक फौजदार रमाकांत पटारे, रमेश गायकवाड, विजय निकम, चंद्रकांत गवळी, राजेंद्र साळुंके, ओमप्रकाश बनकर, कैलास काकड, नितीन देशमुख, संदीप सानप आणि हिरा चिंतोळकर यांचे पथक हबीबच्या घरी पोहोचले. तेव्हा शेडमध्ये गुटख्याची पोती, चारचाकी (एमएच २० बीवाय ९६४६) सापडली. हबीबने जालन्यातील अश्फाक तांबोळीकडून गुटखा आणला होता. तांबोळी फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षभरातील गुटख्याची मोठी कारवाई.. : एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान गुन्हे शाखेने शहरात गुटख्याची केलेली मोठी कारवाई आहे. यापूर्वी जवाहरनगर पोलिसांनी काबरानगर, गारखेड्यातील शेख अश्फाक शेख निसारच्या घरातून ४०, ९१० तर १२ जून २०२१ रोजी सिडको पोलिसांनी स्वामी विवेकानंदनगर, हडकोतील अनिकेत लड्डाच्या घरातून ६९,२३८ आणि सातारा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन योगेश शिंदेच्या घरातून २,७५,००० हजारांचा गुटखा जप्त केला होता. याशिवाय गुन्हे शाखेनेच होली क्रॉस शाळेसमोर विक्रीला जाणारा सव्वातीन लाखांचा, उस्मानपुरा पोलिसांनी दीड लाखाचा गुटखा जप्त केला होता. बिडकीनच्या अरमान ट्रेडर्सच्या मालकाला अटक केली होती.

जप्त केलेल्या साठ्यात हिरा, गोवाच जास्त
पोलिसांच्या माहितीनुसार जप्त केलेल्या साठ्यात सर्वाधिक हिरा, गोवा गुटख्याच्या पुड्या आहेत. इतरांच्या तुलनेत किंमत कमी असल्याने त्याची मागणी अधिक असते. कर्नाटक, आंध्रातून गुटखा चिकलठाणा, मुकुंदवाडी, वाळूज, दौलताबाद, लासूर स्टेशनला मध्यरात्रीनंतर येतो. तेथून तो पहाटे पाच ते सहाच्या सुमारास औरंगाबादेतील विक्रेत्यांकडे पोहोचवला जातो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...