आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:आंबाळा फाटया जवळ जीपमधून 2.75 लाख रुपयांचा गुटखा जप्त, हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर आंबाळा फाटयाजवळ एका जीपमधून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी 2.75 लाख रुपये किंमतीचा विमल गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी ता. 23 हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर आंबाळा फाट्याजवळ एका जीपमधून गुटखा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक संदीप यामावार, जमादार रवीकांत हरकाळ, आशिष उंबरकर, गजानन पोकळे, अशोक धामणे यांच्या पथकाने आज पहाटे छापा टाकला. यामध्ये एका जीपची तपासणी केली असता त्यात गुटख्याचे पोते आढळून आले. पोलिसांनी पोते उघडून पाहिले असता त्यात विमल गुटखा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर गुटखा ठिकठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर जीप व गुटख्याची पोते हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणली आहे. या गुटख्याची किंमत 2.75 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जीप चालकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...