आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोली व वसमत येथे दोन ठिकाणी छाप्यात तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली व वसमत येथे दोन ठिकाणी छाप्यात तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त, हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली वसमत व हिंगोली येथे  शुक्रवारी (ता.२६) रात्री टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात एका घरात गुटखा व सुगंधी पानमसाला साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, भगवान आडे, किशोर कातकडे, राजूसिंग ठाकूर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, प्रशांत वाघमारे सुनील अंभोरे, संभाजी लकुळे, महिला पोलिस कर्मचारी पारू कुडमेथे यांच्या पथकाने पेन्शनपुरा भागातील शेख फयाज याच्या घराची तपासणी केली. यामध्ये घरात २५ हजाराचा सुगंधित तंबाखू व वजीर गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यासोबतच वसमत येथे पावरलूम भागात शेख नजीर उर्फ दौलत याच्याकडेही गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी वसमत येथे छापा टाकला. यामध्ये २ लाख ७५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...