आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन पाणी पुरवठा योजना मुदतीत पूर्ण करा-प्रशासक:24 महिन्यात पाणीपुरवठा योजना होणार कार्यान्वित -'जीव्हीपीआर' कंपनीची हमी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणारी नविन पाणीपुरवठा योजनेच्या काम वेळेत पूर्ण करण्यासाठी काही अडचणी आल्यास शहर अभियंता यांच्याशी नियमित संपर्क करा. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास थेट माझ्याशी संपर्क करा मात्र पाणी पुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश मे. जीव्हीपीआर इंजिनिअर्स कंपनीला महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिले असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चोवीस महिन्यात पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याची लेखी हमी दिली.

नविन पाणी पुरवठा योजनेसंदर्भात स्मार्ट सिटी कार्यालयात आज मंगळवारी दुपारी आढावा बैठक झाली. या बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मनपा शहर अभियंता एस डी पानझडे व मे जीव्हीपीआर इंजिनिअर्स कंपनीचे जी शिवशंकर, निर्णय अग्रवाल यांच्याशीही पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली.

नविन पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मे. जीव्हीपीआर इंजिनिअर्स कंपनीला शहरात टाकण्यात येणाऱ्या एचडीपीई पाईपबाबत ब्लॅंकेट मान्यता दिली आहे.

आमदार खासदार या लोकप्रतिनिधींच्या निधीतून होणार या रस्त्याच्या कामाचा प्लॅन महानगरपालिकेकडून घ्यावा त्यानुसार एचडीपीई पाईप लाईन टाकण्यात यावी, शहरातील देवळाई सातारा परिसर चारशे किलोमीटर, 207 कोटीचे 85 किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे.

तत्पूर्वी एचडी पीई पाईप टाकण्याचे काम करण्यात यावे , 317 कोटी रूपयांच्या 221 किलोमीटर रस्त्यावर पाईप लाईन टाकत असताना तसेच सातारा देवळाई परिसरात इतर ठिकाणी काही अडचणी असल्यास शहर अभियंता शी संपर्कात राहुन अडचणी सोडवाव्यात, शहरअभियंता यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. झालेल्या रस्त्यावर पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार असल्याने या नविन योजनेच्या निविदेमध्ये या खोदलेल्या रस्ते दुरुस्ती करण्यासाठी तीस कोटींची तरतूद करण्यात असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...