आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ५० लाख रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएस व एनएफटीमार्फत लंपास झाल्याची तक्रार बँकेतर्फे बुधवारी शिवाजीनगर ठाण्यात देण्यात आली. याला आयडीबीआय बँक जबाबदार असल्याचे सांगत ती परत मिळावी, अशी मागणी शंकर नागरी सहकारी बँकेचे मुख्याधिकारी विक्रम राजे यांनी केली आहे. खाते हॅक झाल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.
राजे म्हणाले, आयडीबीआय बँकेतील खात्यातून हॅकर्सने चार दिवसांपूर्वी १४ कोटी ५० लाख रुपये लंपास केले. ही बाब लक्षात येताच बँकेकडे चौकशी केली. आरटीजीएस व एनएफटी करतेवेळी बँकेला आम्ही सूचना देतो तेव्हा ते रक्कम पास करतात. पण आम्ही असे काही केले नाही. त्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी आयडीबीआय बँकेची असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आयडीबीआयचे मॅनेजर रूपेश कोडगिरे म्हणाले, ‘बँकेचे खाते हॅक झाले नाही. त्यांच्या खात्याची जुळवाजुळव होत नसावी किंवा सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण असल्याने ही समस्या उद्भवली असेल.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.