आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नेत्यांना कोरोना:हदगावचे आमदार माधवराव जळगावकर कोरोना पॉझिटिव्ह, नांदेड जिल्ह्यातील चौथे कोरोना बाधित आमदार ठरले

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी अशोक चव्हाण, मोहन हंबर्डे आणि अमरनाथ राजूरकर यांना कोरोनाची लागण झाली आहे

काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार माधवराव जवळगावकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यांच्यावर नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेणार आहेत. माधवराव जळगावकर यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदारकी मिळवली. माधवराव जवळगावकर हे नांदेड जिल्ह्यातील चौथे कोरोनाबाधित आमदार ठरले आहेत. याआधी काँग्रेसच्याच तीन आमदारांना कोरोनाची लागण झाली होती.

याआधी नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मोहन हंबर्डे आणि विधान परिषदेवरील आमदार अमरनाथ राजूरकर यांना कोरोनाची लागण झाली. आता जळगावकर हे कोरोना पॉझिटिव्ह ठरलेले नांदेडमधील चौथे आमदार आहेत. अशोक चव्हाण तसेच मोहन हंबर्डे यांनी कोरोनावर मात केली आहे. तर आमदार अमरनाथ राजूरकर आणि माधवराव जळगावकर यांच्या उपचार सुरू आहेत.

नांदेडमधील कोरोना पॉझिटिव्ह आलेले आमदार

1) अशोक चव्हाण (भोकर, काँग्रेस ) – कोरोनामुक्त

2) मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) – कोरोनामुक्त

​​​​​​​3) अमरनाथ राजूरकर (विधानपरिषद, कॉंग्रेस) – उपचार सुरु

4) माधव जवळगावकर (हदगाव, कॉंग्रेस) – उपचार सुरु