आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग दुसरा दिवस:अनेक जिल्ह्यांना अवकाळीने झोडपले, बीड जिल्ह्यात गारपीट; हिंगोली, परभणीत वीज कोसळून 2 ठार

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यात शनिवारी जालना, हिंगोली, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस व गारपीट झाली. हिंगोली जिल्ह्यात अंगावर वीज पडून शेतकरी तर परभणी जिल्ह्यात महिलेचा मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बोरगाव व बीड तालुक्यातील पोखरी घाट, बेलखंडी येथे गारपीट झाली. आष्टी तालुक्यातील कडा परिसरात अवकाळी पाऊस झाला. तसेच वडवणीत विजांच्या कडकडाटासह एक तास पाऊस झाला. जालना, हिंगोली, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

परभणीत शेतात कापूस वेचणी करताना महिला, तर हिंगोलीत शेतकऱ्याचा मृत्यू
{परभणी जिल्ह्यामधील मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथे शेतामध्ये कापूस वेचणी करत असताना वीज अंगावर पडून इंदुमती नारायण होंडे या ६० वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.

{हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा शिवारामध्ये शेतात काम करताना अंगावर वीज पडून पिराजी विठ्ठल चव्हाण (३८) या शेतकऱ्याचा मृत्यू, तर एक महिला जखमी झाली.