आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर हजयात्रेला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते जेद्दाह विमानसेवेसाठी भाविकांना ८८ हजार रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत नाराजी पसरली आहे. यावर खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून मुंबई-हैदराबाद एम्बार्केशन पॉइंट प्रमाणेच अंदाजित खर्चास मान्यता देण्याची मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि हज कमिटीचे सीईओ यांच्याकडे पत्राद्वारे केली.
अचानक वाढलेल्या या खर्चामुळे भाविकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शहरातून १७०२ मुस्लिम बांधव यंदा हजला जात आहेत.
हज यात्रेला जाण्यासाठी संकट
यात्रेला जाण्यासाठी मोठे संकट या सर्वांपुढे आले आहे. मराठवाड्यातील पहिले हज हाऊस छत्रपती संभाजीनगर येथे या वर्षी सुरू होत आहे. येथील विमानतळास इमिग्रेशन आणि कस्टम विभागाची अधिकृत मान्यता आहे. त्यामुळे हज उमराहसाठी येथून जेद्दाहला जाण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी २७ एप्रिल रोजी दिल्ली येथे झालेल्या नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी केली.
अचानक केली ७५ हजारांची वाढ
मुंबई येथून जाणाऱ्या हजयात्रेकरूंना ३ लाख ४ हजार खर्च येणार आहे. अचानक ८८ हजार रुपये वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या भाविकांना ३ लाख ९२ हजार मोजावे लागणार आहेत. २०१७ मध्ये एर्माकेशनसाठी १० हजार ५५० रुपये लागत होते.
२०१९ मध्ये ही रक्कम १३ हजार १५० रुपये झाली. २०२१-२०२२ मध्ये भारतीयांना हजयात्रेला बंदी होती. ही रक्कम २०२३ मध्ये वाढून २० हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज होता. मात्र, अचानकपणे ७५ हजारांची वाढ होऊन ८८ हजारांची रक्कम यासाठी मोजावी लागणार आहे. हा भाविकांसाठी मोठा धक्का आहे.
दिल्लीत पत्रव्यवहार
नागपुरातूनही ६२ हजार भाविकांना मोजावे लागणार आहेत. शहरातून १७०२ तर नागपूरहून ३ हजार हजयात्रेकरू जाणार आहेत. ४ हजार ७०२ भाविकांच्या पुढे ही समस्या निर्माण झाली आहे. मिर्झा रफत बेग, खिदमत ए हुज्जाज कमिटी खिदमत ए हुज्जाज कमिटीने दिले निवेदन, खासदार इम्तियाज यांनी दिल्लीत पत्रव्यवहार केला .
हज यात्रींची संपूर्ण प्रक्रिया राबवणारी आणि इत्थंभूत मार्गदर्शन करणाऱ्या खिदमत ए हुज्जाज कमिटीने हा खर्च कमी करण्यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले आहेत. याकरिता विविध ठिकाणी पत्रव्यवहार आणि निवेदने दिली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.