आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:कौठा शिवारातील नाल्याजवळ आढळले अर्धविकसीत अर्भक; अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ काढल्याचा पोलिसांना संशय

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • गर्भाची पुरेशी वाढ न झाल्याने ते अर्भक मुलगा किंवा मुलगी हे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले

वसमत तालुक्यातील कौठा शिवारातील नाल्याजवळ एका कॅरीबॅगमध्ये कापडात बांधून फेकून दिलेले साडेचार महिन्याचे अर्भक सापडले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 24 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. अनैतिक संबंधातून गर्भ राहिल्यामुळे गर्भपात केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कौठा शिवारातील एका नाल्याजवळ शनिवारी सायंकाळी एका कॅरीबॅग जवळ काही कुत्रे भुंकत होते. त्यामुळे शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला संशय आल्याने त्याने कुत्र्यांना हाकलून कॅरीबॅगमध्ये पाहिले असता त्यात एका कपड्यात गुंडाळलेले अर्भक दिसून आले. त्याने तातडीने वसमत ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली.

या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक खार्डे, जमादार भुजंग कोकरे, रुपेश गरूड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कॅरीबॅग घेऊन त्यात पाहिले असता त्यामधे चार महिन्याचे अर्भक असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर कॅरीबॅग मधील मृत अर्भक ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या गर्भाची पुरेशी वाढ झाली नसल्याने ते अर्भक मुलगा किंवा मुलगी हे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अनैतिक संबंधातून गर्भ राहिल्यामुळे अवैधरित्या गर्भपात केला गेला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक चवळी यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...