आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा इशारा:गुलमंडीत महापालिकेने ताेडलेल्या स्वच्छतागृहासाठी अर्धनग्न आंदोलन

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलमंडीतील मराठा हॉटेलशेजारील मुतारी मनपाने काही महिन्यांपूर्वी हटवली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांचे स्वच्छतागृहही बंद आहे. त्यामुळे औरंगपुरा, गुलमंडी परिसर मुख्य बाजारपेठेत स्वच्छतागृह व मुताऱ्या बनवण्यात याव्यात या मागणीसाठी २१ नोव्हेंबर रोजी रमेश पाटील यांनी मनपा मुख्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गुलमंडी, औरंगपुऱ्यात खरेदीसाठी महिला मोठ्या संख्येने येतात. त्यांच्यासाठी या परिसरात स्वच्छतागृह नाही.

त्यामुळे मनपाने त्वरित स्वच्छतागृह बांधावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी मनपाकडे केली हाेती. उलट पुरुषांसाठी असलेली गुलमंडीतील मुतारीसुद्धा मनपाने काढून टाकली. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी विवस्त्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मनपासमोर पोलिस तैनात होते. २१ नोव्हेंबर रोजी अचानक मुताऱ्या तयार करा, अशा घोषणा देत पाटील मनपाकडे येत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...