आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापारी त्रस्त:औषधी भवन रस्त्याची साडेसाती संपेना; व्यापारी त्रस्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावर मार्किंग करण्याची मागणी

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांपासून औषधी भवनचा नाला कचऱ्यामुळे चोकअप होऊन दुकानात पाणी शिरते हाेते. त्यामुळे नाल्याचे काम सुरू झाले अन् कामही अंतिम टप्प्यात आले. परंतु, या ठिकाणी वाहनधारक व्यवस्थितपणे वाहने पार्क करत नसल्याने आता व्यावसायिकांना पार्किंग समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठी मार्किंग करायला पाहिजे, अशी मागणी व्यापारी करीतआहेत. औषधी भवचा रस्ता गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, येथील समस्या कायमच असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी वाहने उभी करण्यासाठी मार्किंग करण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सादिया टॉकीजच्या पाठीमागील बाजूच्या औषधी भवनच्या नाल्याचे काम दीड ते दोन वर्षांपासून सुरू होते. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये नाल्याचे काम अंतिम टप्प्यात आले. दरम्यान, १४ सप्टेंबर २०२१ राेजी अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरामध्ये अनेकांचे नुकसान झाले. या वेळी मनपा प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सतीश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, एमएसआरडीसी विभागाचे एस. व्ही अभंग, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, व्यापारी प्रतिनिधी अजय शहा, हायटेक इन्फ्रातर्फे सारडा, कंत्राटदार अजय चावरिया, चंद्रशेखर मिरगेआदींची बैठक झाली होती. यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी औषधी भवनच्या पाठीमागील नाल्यावर जाळी बसवावी, अशी मागणी केली हाेती. शहर अभियंत्याकडून ती मान्य केली. मात्र, अजूनही त्यावर हालचाली झाल्या नाहीत. डिसेंबर २०२० मध्ये नाल्याचे काम झाल्यानंतर जानेवारीत सिमेंट काँक्रिटीकरण सुरू करायचे होते. परंतु, वाहतूक विभागाची एनओसी मे महिन्यातआल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.आता रस्ता पूर्ण झाला. मात्र, व्यापाऱ्यांना पार्किंगचा प्रश्न भेडसावत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते.

बातम्या आणखी आहेत...