आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना जैविक शेतीसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचा या वर्षी चांगला परिणाम पाहायला मिळाला. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या प्रदर्शनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे कौतुक केले. विशेष म्हणजे रसायनमुक्त शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट ते दुपटीने भाव मिळत आहे. राष्ट्रीय जनजातीय अनुसंधान संस्थान दिल्लीत सात जून रोजी झालेल्या प्रदर्शनात औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सहभगा घेतला. या प्रदशर्नात शेतकऱ्यांनी सेंद्रिय, विषमुक्त गहू, बाजरी, जवस, हरभरा, लसूण, मेथी, ओवा, शेफा, ज्वारी, हळद, करडई या प्रकारचे एकूण २३ धान्य शेतकरी उत्पादन प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. शेतमालाला योग्य भाव आणि शाश्वत बाजार मिळावा यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कंपन्याकडून खरेदीची हमीही मिळवून दिली. त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे. याबाबत बोलताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महातोले यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रशिक्षण दिले. जमिनीतील मातीचे मातीचे परीक्षण करून कोणती पिके घ्यावीत याचे मार्गदर्शन केले. वैजापूर, कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड तालुक्यात विषमुक्त शेतमाल संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
गव्हाला ९ हजार रुपये भाव
बाजारसावंगीचे जानकीराम नलावडे यांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जैविक शेतीचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर आता त्यांची पूर्ण पंधरा एकर शेती ते जैविक पद्धतीने करतात. या वर्षी त्यांच्या खपली गव्हाला एकरी ३० क्विंटल इतके उत्पादन झाले. जैविक गहू असल्यामुळे त्यांच्या गव्हाला ९,००० रुपये क्विंटल इतका भाव मिळाल्याचे नलावडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.