आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडळाचे निर्देश:सोमवारपासून मिळणार दहावी परीक्षेचे हॉलतिकीट ; विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारू नका

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना सोमवार, ६ फेब्रुवारीपासून दुपारी ३ वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करून दिले जातील.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी, २० फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठीच्या हॉलतिकिटाचे वितरण विद्यार्थ्यांना शाळांनी करायचे आहे. तर, ६ फेब्रुवारी रोजी शाळांच्या लॉगइनमध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करून घेता येईल. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहू शकतात.

हॉलतिकिटाची ऑनलाइन प्रिंट देताना शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये. प्रिंटवर मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का असावा. हॉलतिकिटामध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्यांच्या दुरुस्त्या मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख आणि जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवावी, असेही मंडळाने म्हटले आहे. हॉलतिकीट गहाळ झाल्यास शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन प्रवेशपत्र द्यायचे आहे, असेही राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी शाळांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...