आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मनपाची कारवाई:जी-20 च्या पाहुण्यांची पाठ फिरताच सिडकोतील अतिक्रमणांवर हातोडा

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील पाहुणे जी-२० च्या निमित्ताने शहरात आले होते. १ मार्च रोजी ते परत गेले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मनपाने सिडकाेतील अतिक्रमणांवर हाताेडा उगारला. गुरुवारी जळगाव रोडलगत असलेला ग्रीन बेल्ट मोकळा करण्याचे काम मनपाने हाती घेतले. दुसऱ्या टप्प्यात सिडकोतील मोकळ्या जागा आणि नंतर रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली जातील. विशेष म्हणजे जुन्या शहरातदेखील रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. सिडको-हडकोत अतिक्रमणे वाढली आहेत.

वारंवार सूचना देऊनही मनपाने काहीही कारवाई केली नाही म्हणून औरंगाबाद खंडपीठाने मनपाच्या अधिकाऱ्यांना दंड ठोठवला. त्यामुळे गुरुवारी सकाळी पथकाने एन-५ येथून कारवाई सुरू करत ग्रीनबेल्टमधील अतिक्रमणे तसेच ग्रीनबेल्टमधून जळगाव रोडकडे जाणारे छोटे-छोटे रस्ते बंद करण्यासाठी ते खोदून अतिक्रमण काढले. एन-१ ते एन-१३ भागातील सिडकोच्या खुल्या जागा, फुटपाथ, ग्रीनबेल्ट यावरील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत.

विद्रूपीकरण करू नका जी-२० निमित्ताने शहर सजले आहे. आता विद्रूपीकरण, चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. सर्व रस्त्यांवर सीसीटीव्ही आणि नागरी मित्र पथकांची नजर असेल. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आंबेडकरनगर, उस्मानपुरा, कॅनॉट येथील अतिक्रमण काढून धडक कारवाई सुरू केली होती. जी-२० मुळे ब्रेक लागला होता. आता नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावीत, मनपाची कारवाई सुरूच राहील, असे प्रशासकांनी सांगितले.

कॅनॉट परिसरातील मोमोजच्या सहा चारचाकी जप्त सिडको एन-५, वोक्हार्ट चौक, रेणुकामाता मंदिर परिसर, एन-७ पेट्रोल पंपलगतचा परिसर, एसबीओए चौकातील ग्रीनबेल्टमधील अतिक्रमणे काढली. कॅनॉटमधील मोमोजच्या ६ चारचाकी गाड्यांसह सामान जप्त केले. पंक्चरचे दुकान, चिश्तिया चौक ते एमजीएमकडे रस्त्यावरील अंडा ऑम्लेट, पावभाजी, पाणीपुरीच्या हातगाड्यांवर कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...