आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:लग्न समारंभात वऱ्हाडींना सुरुची भोजन देणारे हात मात्र उपाशी, व्याजाने पैसे घेवून घर चालवण्याची वेळ

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसमारंभ असो वा इतर कोणत्याही मंगल कार्यात सुंदर सजावट, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कितीही थाटामाट असला तरी त्या समारंभाची खरी शोभा वाढते ती चविष्ट जेवणानेच हजारोंंच्या संख्येने उपस्थिती असणाऱ्या वऱ्हाडींना आपल्या सुरुची भोजनाने तृप्त करणाऱ्या स्वयंपाकी मावशी, काका, दादांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. रोज दोनशे रुपये कमवणारे हे हात आता खाली झाले असून, व्याजाने पैसे घेवून घर चालवण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी थोडीफार तरी मदत मिळाली होती. पण दोन तासत लग्न उरका असे म्हणाऱ्या माय-बाप सरकारने आमच्यासारख्या कामगार वर्गाचा विचार करत नेमके दोन तासात कसे लग्न करावे याचे देखील मार्गदर्शन करायला हवे असा सवाल उपस्थित केला आहे.

लग्नसमारंभात मंडप, सजावट, फुलांच्या माळा, बॅण्डवाले, घोड्यावाला यांच्यासह विशेष भाग असलेले लोक म्हणजे केटर्सच्या हाताखाली असणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी, भांडी धुणे, जेवणासाठीचे सर्व भाजीपाला, दाळ-तांदुळ निवडणे, जेवण तयार करतांना कोणतीही कमतरता राहणार नाही. याची काळजी घेत जेवणारा प्रत्येक व्यक्ती तृप्त होईल. यासाठी सुरुची भोजनावर विशेष लक्ष दिले जाते. औरंगाबाद शहरात जवळपास अडीचशे केटर्स आहेत. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मुकादम मावशी आणि त्या मावशींमुळे आणखी दहा ते बारा महिलांना काम मिळते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे सरकारने दोन तास लग्न समारंभ करा आणि पंचवीस जणांचीच उपस्थिती असावी असे निर्बंध केले आहेत. यामुळे त्या लग्न समारंभातील कामावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संजय नगर परिसरात राहणाऱ्या जिजाबाई त्र्यंबक पवार यांनी सांगितले की, आमच्या घरात आम्ही सात माणस राहतो. माझे पती मातीकाम करतात तर मुलगा कापड दुकानात होता. मी लग्नसमारंभात केटर्सच्या हाताखाली काम करत होते. परंतु आता काम बंद आहे. मुलगा दुकानात काम करत होता कापड दुकानही बंद झालेत पतीचे कामही कधी आहे कधी नाही. घर कस चालवायच असा प्रश्न पडतो आहे.

उसने मागून घर चालवण्याची वेळ - मी चाळीस वर्ष झाली केटर्स अंतर्गत लग्नसमारंभात स्वयंपाकाच काम करते आहे. आमच्यामुळेे आणखी काही महिलांना काम मिळत. माझ्या घरात मी माझी सुन आणि नात आहे. पती आणि मुलगा नाही. माझाच आधार घराला आहे. पण सरकार म्हणत दोन तासात लग्न समारंभ करा तो कसा होणार याच उत्तर द्याव. आमच्या सारख्या हातावर पोट असणाऱ्यांनी घर कसं चालवायच. एरवी लग्नसमारंभात दोनशे ते तीनशे रुपये रोज मिळत असे. जेवण मिळायच ते आम्ही घरी देखील आणायचो तर राशन फार लागत नव्हत. आता समारंभच बंद झाल्याने राशनचे देखील वांदे झाले आहेत. व्याजाने तर कधी उसने पैसे घेवून घर चालवण्याची वेळ आली आहे.हिराबाई वसंत पवार

यंदा तर मदतही नाही - या तीन चार महिन्यात लग्नसमारंभात मिळणाऱ्या कामामुळे दहा ते बारा हजार रुपये आम्हाला मिळत होते. परंतु माणसांमागे शंभर दोनशे वाढायचे. पण कामच बंद झाल्याने पैसे नाहीत. मागच्याा वर्षी लॉकडाऊनमध्ये केटरिंग मालकांनी पाच किलो गहू, दाळ, तांदुळ दिले होते. पण आता मदत मिळत नाही. रामकौर डिघोळे काकाजी

बातम्या आणखी आहेत...