आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेराॅक शालेय चषक स्पर्धा:चाटे स्कूल संघाकडून हॅप स्कूल पराभूत, निश्चित राजपूत ठरला सामनावीर पुरस्काराचा मानकरी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एन-2 चाटे स्कूल संघाने विजय मिळवला. एकतर्फी झालेल्या लढतीत चाटे संघाने हॅप इंटरनॅशनल स्कूलवर 47 धावांनी मात केली. अष्टपैलू खेळाडू निश्चिंत राजपूत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत 4 बाद 123 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर श्लोक यांडे व शितल बोरकर 5 धावांवर परतले. श्रेणीक दुधेदियाने 10 धावा केल्या. अवधूत गावंडे अवघ्या एका धावेवर बाद झाला. संघ संकटात असताना कर्णधार निश्चंत राजपूतने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत सर्वाधिक नाबाद 49 धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने राहिले. त्याने 36 चेंडूंचा सामना करताना 6 सणसणीत चौकार खेचले. संकेत पांडेने 15 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 16 धावा केल्या. हॅपकडून राजवीर गायकवाडने 16 धावा देत 2 गडी बाद केले. कुणाल चव्हाण आणि रोहन हरने यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. अमन गजभिये सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3 षटकांत 22 धावा दिल्या.

प्रत्युत्तरात चाटेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हॅप इंटरनॅशलन स्कूल संघाचा डाव 13.3 षटकांत सर्वबाद अवघ्या 76 धावांवर ढेपाळला. चाटेचा कर्णधार निश्चिंत राजपूतने फलंदाजी शानदार कामगिरी केल्यानंतर गोलंदाजीत ही कमाल केली. त्याने आपल्या भेदक माऱ्याने आघाडीच्या ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

हॅपचा कर्णधार रोहन हरणे अवघ्या 4 धावांवर परतला. सलामीवीर फहिम खानदेखील एका धावेवर बाद झाला. कुणाल चव्हाणने 11 धावा केल्या. इशान इंगळेने 23 धावांत 1 चौकारासह 13 आणि रोहन विजयने 15 चेंडूंत 2 चौकार खेचत सर्वाधिक 13 धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही काढता आली नाही. चार फलंदाजा भोपळाही फोडू शकले नाहीत. चाटेकडून श्रेणीक दुधेदियाने 12 धावा देत 3 आणि सोहम भोसलेने 2 गडी बाद केले. संकेत पांडे व प्रतिक होलांबेने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...