आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्किंग पूर्ण:हर्सूलचा रस्ता मोठा झाला तर आनंदच; मात्र पाडापाडीआधी मोबदला द्या ; 7 मीटरचा रस्ता होणार 30 मीटर रुंद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लेबर कॉलनीनंतर प्रशासनाने आपला मोर्चा हर्सूल रस्ता रुंदीकरणाकडे वळवला आहे. सध्या ७ मीटर असलेला हा रस्ता लवकरच ३० मीटर रुंद होणार आहे. यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या १०२ मालमत्ता जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. ज्या स्थानिकांची, व्यावसायिकांची घरे-दुकाने रुंदीकरणात जाणार आहेत, त्यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. रस्ता रुंदीकरणाला कुणाचाच विरोध नाही. मात्र, आम्हाला योग्य आणि पाडापाडीच्या आधी मोबदला मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. मोबदल्याऐवजी हर्सूल परिसरातच गट नं. २१२ येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत पुनर्वसन करावे, अशीही मागणी व्यावसायिक करत आहेत.

काम लवकर सुरू करावे ^मी गेल्या २० वर्षांपासून सलून चालवतो. माझे दुकान रुंदीकरणात जाणार आहे. तरीदेखील लाखो लोकांची वाहतूक कोंडीतुन सुटका हाेईल, याचे समाधान आहे. पावसाळ्यात नाहक त्रास होऊ नये एवढीच इच्छा. - राजू पंडित

रुंदीकरण चांगलेच ^आमचे ३ वर्षांपासून इलेक्ट्रिकचे दुकान आहे. आता ते दुसरीकडे हलवावे लागेल. आम्ही विरोध करू शकत नाही. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न होता. आता रुंदीकरणाचे प्रशासनाने मनावर घेतले आहे हे चांगले झाले. - हिरा देविदास सुरे

बातम्या आणखी आहेत...