आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सव:एमजीएममध्ये वर्षामंगल उत्सव ; जेएनईसी परिसरात वृक्षारोपण

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एमजीएममध्ये “वर्षामंगल’ उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवांतर्गत वृक्षदिंडी, वर्षामंगल संगीत कार्यक्रम, रक्तदान शिबिर, हरिकीर्तन झाले.

बुधवारी सकाळी ७ वाजता टाळ, मृदंगवादन आणि नृत्य करत वृक्षदिंडी काढण्यात आली. जेएनईसी परिसरात वृक्षारोपण केले. महात्मा गांधी यांच्या विचारांमधून मांडलेल्या सात पातकांविषयीच्या जनजागृतीविषयक शिलाचे लोकार्पण अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते झाले. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिरही पार पडले.

रामायणाचार्य स्नेहलता खरात यांनी हरिकीर्तन सादर केले. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने एमजीएम नर्सिंग महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी जमवलेला एक लाख रुपयांचा निधी अंकुशराव कदम यांना सुपूर्द केला. दरम्यान, मुक्ता बर्वे हिने या वेळी वारकरी महिलांसोबत नृत्यही केले.

बातम्या आणखी आहेत...